पोरांनो तयारीला लागा ; राज्यात लवकरच पोलिसांच्या २० हजार पदांची मेगाभरती

Published On: सप्टेंबर 27, 2022
Follow Us

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजेच राज्यात लवकरच पोलिसांच्या २० हजार पदांची मेगाभरती होणार आहे. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पार (Breaking News) पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस भरतीबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलिसांच्या 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहेत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन दोन वर्षांतील पोलीस भरती लवकरच घेतली जाणार आहे. एकूण 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. आठ हजार पदांसाठी आधीच (Breaking News) जाहिरात निघाली आहे. आता लवकरच 12 हजार पदांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. पोलीस दलास यामुळे निश्चित फायदा होईल अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now