बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर ! राज्यात पोलीस दलात १२ हजार पदांची मेगा भरती

Published On: जानेवारी 12, 2021
Follow Us
Maharashtra Police Bharti (1)

बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. बेरोजगार तरुणांसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

राज्यात पोलीस दलात एक दोन नव्हे तर तब्बल १२ हजार ५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.अनिल देशमुख यांनी यांसंदर्भातील आदेश गृहविभागाला दिले आहेत. त्यानुसार लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती होणार आहे तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. मात्र, ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र पोलीस भरती २०१९ करिता एसईबीसीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीर राज्यातील पोलीस दलावर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या या निर्णयामुळे हा ताण काहीसा कमी करता येऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now