⁠  ⁠

अखेर पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल ! 11 हजार 443 पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा (Maharashtra Police Recruitment 2022) मार्ग अखेर मोकळा झाला झाला असून शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. Maharashtra Police Bharti 2022

कोरोना महामारीमुळे राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. अखेर 11 हजार 443 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.

या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदं रिक्त झाली होती. रिक्त झालेल ही पदं 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share This Article