⁠  ⁠

पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर! राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत बंपर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023 महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023  आहे.

एकूण रिक्त जागा : 309

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहकारी अधिकारी श्रेणी १ – 42
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण

2) सहकारी अधिकारी श्रेणी २- 63
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण

3) लेखापरिक्षक श्रेणी २ -07
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण

4) सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक- 159
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण

5) उच्च श्रेणी लघुलेखक- 03
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

6) निम्न श्रेणी लघुलेखक -27
शैक्षणिक पात्रता
: 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

7) लघुटंकलेखक – 08
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

वयाची अट : 21 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – 900/- रुपये]

किती पगार मिळेल?
सहकारी अधिकारी श्रेणी 1 -38600-122800
सहकारी अधिकारी श्रेणी 2 – 35400-112400
लेखापरिक्षक श्रेणी 2 – 35400-112400
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक – 25500-81100
उच्च श्रेणी लघुलेखक – 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक – 38600-122800
लघुटंकलेखक – 25500-81100
सर्व पदांना अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर भत्ते देय लागू राहील

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :21 जुलै 2023  24 जुलै 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.sahakarayukta.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article