⁠  ⁠

तरुणांसाठी खुशखबर..! महाराष्ट्रातील ‘या’ 5 विभागांमध्ये होणार बंपर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी चुकवू नका. नेमकी कोणत्या विभागात ही भरती होणार आहे. हे सविस्तरपणे जाणून घेवूया… Maharashtra State Government Megabharti 2023

1. MPSC अंतर्गत 1037 जागांवर भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क, लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://mpsconline.gov.in/candidate 

2. महाराष्ट्र तलाठी भरती –
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठीपदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – PDF
अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/

3. महाराष्ट्र पोलीस भरती –
राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तरुण तरुणींना पोलीस होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात (State Government Megabharti) आली आहे. 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दि. 2 जानेवारीपासून या भरतीच्या शारीरिक चाचणीची सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवसात लेखी परीक्षा होणार आहे.

4. बँक ऑफ महाराष्ट्र येथे मोठी भरती –
बँक ऑफ महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी (State Government Megabharti) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी– PDF
अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

5. महाराष्ट्र वन विभाग भरतीमहाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र (State Government Megabharti) उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

Share This Article