Maharashtra Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य तलाठी पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 4644 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन प्रक्रिया 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 25 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 4644
पदाचे नाव : तलाठी
जिल्हानिहाय रिक्त पदे :
1) अहमदनगर 250
2) अकोला 41
3) अमरावती 56
4) औरंगाबाद 161
5) बीड 187
6) भंडारा 67
7) बुलढाणा 49
8) चंद्रपूर 167
9) धुळे 205
10) गडचिरोली 158
11) गोंदिया 60
12) हिंगोली 76
13) जालना 118
14) जळगाव 208
15) कोल्हापूर 56
16) लातूर 63
17) मुंबई उपनगर 43
18) मुंबई शहर 19
19) नागपूर 177
20) नांदेड 119
21) नंदुरबार 54
22) नाशिक 268
23) उस्मानाबाद 110
24) परभणी 105
25) पुणे 383
26) रायगड 241
27) रत्नागिरी 185
28) सांगली 98
29) सातारा 153
30) सिंधुदुर्ग 143
31) सोलापूर 197
32) ठाणे 65
33) वर्धा 78
34) वाशिम 19
35) यवतमाळ 123
36) पालघर 142
शैक्षणिक पात्रता :
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय:₹900/-]
पगार – :25500-81100 इतर भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 25 जुलै 2023 (11:55 PM)
शुद्धीपत्रक: पाहा
अधिकृत संकेतस्थळ : https://mahabhumi.gov.in