⁠  ⁠

तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांत 19460 पदांची मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

राज्यातील जिल्हा परिषदेतील भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांमधील तब्बल 19460 पदांची मेगाभरतीची जाहिरात आज म्हणजेच 5 ऑगस्ट पासून निघणार असून अर्ज प्रक्रिया देखील आजपासून सुरुवात होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. ZP Recruitment 2023

नाशिक जिल्हा परिषदेमार्फत 1038 जागांसाठी भरती

राज्यातील ३४ जिल्हा परिषदअंतर्गत आरोग्य विभागातील १०० टक्के व इतर विभागाकडील ८० टक्के रिक्त पदे (गट क) सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. एकूण ३० संवर्गांतील १९,४६० पदे भरली जाणार. ZP Bharti 2023

मार्च २०१९ मध्ये गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र निवडणूक आचारसंहिता, कोरोना व इतर कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील. संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे अर्ज भरावे लागतील. शक्यतो एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील. त्यामुळे उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करू नये.

वयाधिक्य झालेले ‘ते’ उमेदवार देऊ शकतील परीक्षा
ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मध्ये अर्ज केला होता, मात्र आता ज्यांनी कमाल वयाची मर्यादा ओलांडली आहे असे उमेदवार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषदेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व पदांसाठी पात्र ठरतील.

जळगाव जिल्हा परिषदेत 626 जागांसाठी भरती

वयोमर्यादेत २ वर्षे शिथिलता
ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मध्ये अर्ज केलेला नाही त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयास अनुसरून कमाल वयोमर्यादेत २ वर्षे शिथिलता देण्यात आली आहे. तेही ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता पात्र असतील.

आयबीपीएस घेणार परीक्षा
या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत राबवण्यात येईल. त्यात अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणीही आमिषास बळी पडू नये, असे आवाहनही गिरीश महाजन यांनी केले.

कोरोनापूर्वी अर्ज केलेल्यांना आता वयोमर्यादेच्या अटीत शिथिलताही मिळणार; मंत्री गिरीश महाजनांची माहिती

पदांची माहिती वेबसाइटवर
इच्छुकांना ज्या जिल्हा परिषदेत अर्ज करावयाचा आहे त्या संकेतस्थळावर रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, मुदत इतर अटी शर्थी पाहता येतील.

Share This Article