⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे 140 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Mahavitaran Jalgaon Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारीपर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा -१४०

रिक्त पदाचे नाव :
इलेक्टीशियन – ८८
वायरमन -३५
संगणक चालक – १

शैक्षणिक पात्रता : १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वर्षे १८ ते ३० (अनु. जाती व अनु. जमाती यांच्यासाठी ५ वर्ष शिथील)
अर्ज शुल्क : शुल्क नाही
पगार : कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण: जळगांव जिल्ह्यात कोठेही

खालील दर्शविलेल्या कालावधीत आपले शैक्षणीक कागदपत्रे BTRI च्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी (ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज प्रोफाईल परिपुर्ण (१००%) करणे आवश्यक आहे. एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस. सी. बोर्ड प्रमाणपत्र, आय टी आय गुणपत्रक, आय टी आय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अदयावत आधारकार्ड) एक छायांकीत स्वयंम स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी.जळगांव ४२५००३ येथे दिलेल्या वेळापत्रक नुसार जमा करावे.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article