⁠
Jobs

नोकरीची संधी: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरत, जाणून घ्या तपशील

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.

पद संख्या
एकूण १५ जागा

पदांची नावे
१) कनिष्ठ सल्लागार,
२)कनिष्ठ आहार तज्ञ
३) ऑप्टोमेट्रिक
४) ऑडिओलॉजिस्ट
५) कार्यकारी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता काय? 

कनिष्ठ सल्लागार,- उमेदवार मुंबई विद्यापीठ वा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

कनिष्ठ आहार तज्ञ – उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाच्या होम सायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिक्स, न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदविकाधारक असावा. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ऑप्टोमेट्रिक – उमेदवार हा शालांत (एस.एस.सी.) परीक्षेसह ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षांचा पदविकाधारक असावा किंवा उच्च माध्यमिक शालांत (एच.एस.सी.) परीक्षेसह बी.एस्सी. ऑप्टोमेट्रीमधील पदवीधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

ऑडिओलॉजिस्ट – उमेदवार भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रलिया किंवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदविकाधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कार्यकारी सहाय्यक – उमेदवार हा कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा आणि उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची परीक्षा तसेच एम.एस.- सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा किती?
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे

मागासवर्गीय प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे

परीक्षा फी : १०५/- रुपये + जी.एस.टी.

वेतनमान (Pay Scale) :

१) कनिष्ठ सल्लागार, – २५,०००/-
२)कनिष्ठ आहार तज्ञ – २५,०००/-
३) ऑप्टोमेट्रिक – २५,०००/-
४) ऑडिओलॉजिस्ट – २५,०००/-
५) कार्यकारी सहाय्यक – १५,०००/-

अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
२४ सप्टेंबर २०२१

अर्ज सादर करण्याचा पत्ता :  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात (महाविद्यालय इमारत, तळ मजला)

अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : PDF

Related Articles

Back to top button