MCGM बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या १८५ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण 185 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.
एकूण जागा : १८५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ८९
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc)पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची / डी.एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+ D.M.L.T.)
किंवा उमेदवाराने १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
२) औषधनिर्माता/ Pharmacist ९६
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.) ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.
वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ६५ वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते , एफ /दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२.
अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :
१ : येथे क्लिक करा
२ : येथे क्लिक करा