⁠
Uncategorized

Mission STI – 2015

नमस्कार मित्रानो १ फेब्रुवारी २०१५ रोजी होणाऱ्या STI पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर लेखमाला लिहित आहे. त्याचीच हि सुरुवात… येणाऱ्या या STI साठी महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक उमेदवार अर्ज येतील असेच चित्र एकंदरीत आहे. या नुसार आपण अभ्यासात व नियोजनात काय वेगळे करतोय यावर बरचसं अवलंबून आहे. म्हणूनच आपणास योग्य मार्गदर्शन आणि नियोजनपूर्ण Strategical study-plan देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.

४४५ पदांसाठी ही परीक्षा आहे म्हणजे साधारण ५४०० परीक्षार्थी mains साठी निवडले जातील. मागील काही वर्षांपासूनचा cutoff लक्षात घेता  ५२+ स्कोर हा qualifying असेल तर ५७+ safe score असू शकेल. हे मात्र एक अंदाज आहेत जे प्रश्नपत्रिकेनुसार बदलू शकतील. आपण ५७+ score हेच ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची strategy बनवावी.

साधारण ८० दिवस आहेत परीक्षेला, या दिवसांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कशा रीतीने आपण कवर करू शकू इथपासून तर थेट परीक्षेच्या आधल्या दिवसापर्यंतच्या currents आणि test series पर्यंत आपणास आम्ही या वेबसाईट वरून थेट मार्गदर्शन करणार आहोत.
तूर्त इथेच थांबतो.. उठा मावळ्यांनो कामाला लागुयात…

अभ्यासासाठी शुभेच्छा…!!

(पुढील लेख STI च्या प्रश्नपत्रिकेतील अंतर्गत Structure आणि Analysis वर असेल. लवकरच )

Related Articles

2 Comments

Back to top button