---Advertisement---

MPSC : टेम्पो चालकाचा मुलगा सलग दुस-यांदा राज्यात प्रथम

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांच्यासह २० पदांच्या ४०५ जागांसाठी ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सांगली प्रमोद चौगुलेंनी (mpsc pramod chougule) ६३३ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे प्रमाेद चाैगुले यांनी राज्यात सलग दुस-यांदा पहिला क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकाविला आहे.

नाशिक येथे उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत असलेले प्रमाेद चाैगुले हे मिरज तालुक्यातील सोनी गावचे. गेल्या सात वर्षांपासून कामाच्या निमित्ताने चौगुले कुटुंब सांगलीत स्थायिक आहे.

---Advertisement---

प्रमोद चौगुले यांचं शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिर आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व वालचंद कॉलेज मधून झाले. आई-वडिलांचा ध्येय एकच होते मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून प्रमोद यांच्या आई-वडिलांनी कधी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.

प्रमाेद यांचे वडील टेम्पो चालवितात. आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. सन 2020 मध्ये प्रमोद चौगुले यांनी एमपीएससीत पहिल्या येण्याचा बहुमान मिळविला होता. त्यानंतर त्यांची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.

नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. मात्र त्यांना पोलीस विभागात जायचं होतं. त्यामुळे त्यांनी 2021 मध्ये पुन्हा एमपीएससीच्या परीक्षा दिली. त्यात ते पुन्हा राज्यात पाहिले आले आहेत. आता त्यांची डीवायएसपी म्हणून निवड होणार आहे. सलग दाेन वेळा एमपीएससीची परीक्षा देऊन प्रमाेद चाैगुलेंनी त्यांच्या पालकांचे आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरविल्याने त्यांचे गावात काैतुक हाेत आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now