⁠  ⁠

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 673 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

MPSC Civil Services Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023  03 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे. MPSC Bharti 2023

एकूण रिक्त पदे : 673

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 295 पदे
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा 02) इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा 03) इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा 04) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा 05) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

2) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब – 130
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा 02) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ –
शैक्षणिक पात्रता :
01) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षांची पदवी 02) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.

4) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा –
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता 02) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 03) बी.ई. / बी.टेक.

5) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, गट-ब
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. 02) विद्युत अभियांत्रिकी पदवी. 03) बी.ई. / बी.टेक.

6) निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
शैक्षणिक पात्रता
: सांविधानीक विद्यापीठाची मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी

7) अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा, गट-ब
शैक्षणिक पात्रता :
01) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate). 02) केंद्रशासनाच्या मान्यतेचे अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.

वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – 05 वर्षे सूट]
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
खेळाडू – 18 ते 43 वर्षे
दिव्यांग – 18 ते 45 वर्षे

परीक्षा फी : 394/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – 294/- रुपये]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2023  03 एप्रिल 2023 (11:59 PM)
परीक्षा दिनांक : 04 जून 2023 रोजी
परीक्षा केंद्र (पूर्व परीक्षा): महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
शुद्धिपत्रक: पाहा 
|भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article