---Advertisement---

MPSC Current Affairs – March 2020

By Saurabh Puranik

Updated On:

MM-CA-eBook-March20
---Advertisement---

देश

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.  

– GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार
– अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण
– यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद
– मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ
– सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे

---Advertisement---

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर शिक्कामोर्तब

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याआधी प्राथमिक चौकशी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.

[popup_anything id=”75072″]

आतंरराष्ट्रीय

युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर

ब्रेग्झिट समझोता करारावर गुरुवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वाक्षरी केली व नंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही या करारास मंजुरी दिली होती. सार्वत्रिक निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कुठल्याही परिस्थितीत ब्रेग्झिट तडीस नेण्याचा निर्धार केला होता. युरोपीय समुदायाच्या वतीनेही करारावर स्वाक्षऱ्यांचे सोपस्कार पार पडले. ब्रिटनची पुढील वाटचाल कशी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भारत-अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलरचा संरक्षण करार

भारत व अमेरिका यांच्यात मंगळवारी ३ अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार व तीन सामंजस्य करारांना अंतिम रूप देण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातही एक करार करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी असे जाहीर केले की, दोन्ही देशात ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर सहमती झाली आहे. आता यापुढे र्सवकष व्यापार करारावर भर दिला जाईल. दोन्ही देशातील संबंध आता आहेत इतके चांगले कधीच नव्हते. दोन्ही देशात चांगले करार झाले आहेत.

अर्थशास्त्र

साडेसहा टक्के विकासाचा दावा!

देशाने आर्थिक विकास घडवायचा असेल तर संपत्तीची निर्मिती केली पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारगाभ्याला यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात (२०१९- २०) केंद्रस्थानी ठेवण्यात आले. 

पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी बाजारपेठेच्या ‘अदृश्य हाता’ला सरकारच्या पाठिंब्याची गरज असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. चालू वर्षांत (२०२०-२१) विकासाला अधिक चालना मिळण्याची शक्यता गृहित धरली असून ६-६.५ टक्क्यांच्या गतीने देश विकास साधेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

साडेसहा टक्के विकासाचा दावा!

देशाने आर्थिक विकास घडवायचा असेल तर संपत्तीची निर्मिती केली पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारगाभ्याला यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात (२०१९- २०) केंद्रस्थानी ठेवण्यात आले. 

पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी बाजारपेठेच्या ‘अदृश्य हाता’ला सरकारच्या पाठिंब्याची गरज असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. चालू वर्षांत (२०२०-२१) विकासाला अधिक चालना मिळण्याची शक्यता गृहित धरली असून ६-६.५ टक्क्यांच्या गतीने देश विकास साधेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

[popup_anything id=”75072″]

विज्ञान आणि तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जर्मनी – महाराष्ट्राचा सामंजस्य करार

माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन – ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई तर जर्मनीच्या वतीने बॅडन-ह्युटनबर्गच्या मंत्री थेरेसा शॉपर उपस्थित होत्या.

देशातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस मुंबई-पुणे

आजवर सर्व शहरात सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बसेस आता दोन शहराला जोडणार आहेत. मुंबई-पुणे दरम्यान देेशातील पहिली इलेक्ट्रिक सुरू झाली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बसचे उदघाटन झाले. या आलिशान बसमध्ये ४३ लोक बसू शकतात. एकदा या बसची बॅटरी चार्ज झाल्यानंतर ती ३०० किमी चालते.

क्रीडा

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम

ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

बुद्धिबळ: रशियाचा डेव्हिड ठरला जिब्राल्टर मास्टर्स चॅम्पियन 

रशियाच्या डेव्हिड परवयनने १८ व्या जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेचा मास्टर्स किताब पटकावला. त्याने टायब्रेकरमध्ये आपल्याच देशाच्या इसिपेनकाे आणि चीनच्या वांगाे हाऊला पराभूत केले. भारताचे चार खेळाडू शेवटच्या फेरीत अपयशी ठरला. त्यामुळे त्यांचा किताबाचा प्रयत्न अपयशी ठरला. डेव्हिडला आता २८ लाख रुपये आणि ट्राॅफी देउन गाैरवण्यात आले. महिला गटात चीनची जाेंगयी विजेती ठरली. तिलाही ट्राॅफी देण्यात आली.

[popup_anything id=”75072″]

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

6 thoughts on “MPSC Current Affairs – March 2020”

Comments are closed.