लहानपणापासून शिक्षणासाठी धडपड, घरची परिस्थिती बेताची, त्यात सतत येणारे अपयश यामुळे अलोक खिस्मतराव खचला होता. पण हिंमतीने पुन्हा उभा राहिला. अलोक लहानपणापासून हुशार विद्यार्थी होता. त्याला दहावीमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीला सायन्सला ऍडमिशन घेतले. घरापासून दूर असल्याने अभ्यासात रमले नाही. ते परिणामी बारावीमध्ये नापास झाले.
बारावीची दुसर्यांदा परीक्षा दिली, तेव्हाही नापास झाले. तिसऱ्यांदा परीक्षा देताना तर अभ्यासक्रम बदलला होता. तरी त्याने परीक्षा दिली आणि ५५ टक्क्यांनी पास झाला. यात त्याने आत्मविश्वास गमावला होता. आता शिकून काय उपयोग नाही म्हणून मोबाईल रिचार्ज दुकानात देखील काम केले. पुढे, आपल्या हातात काही तरी पदवी असावी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.एसाठी प्रवेश घेतला.
बी.ए पास झाले पण ग्रॅज्युएशन झालेल्याला कोठे नोकरी मिळणार आणि चांगली कशी मिळणार मग त्यांनी झेरॉक्स सेंटर मध्ये काम केले. यानंतर त्याने ठरवले की आपण स्पर्धा परीक्षा द्यायची आणि यश संपादन करायचे. त्याने फिजिकल टेस्ट मध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळाले.
महाराष्ट्र पोलीस सेवेच्या परीक्षेत ग्राऊंडवर शंभरपैकी शंभर मार्क मिळवले.जिद्द ,चिकाटी, भरपूर काम करण्याची क्षमता याच्या जोरावर अलोकने पी.एस.आय पद मिळवले. मित्रांनो, आपले क्षेत्र कोणतेही असो आपण कायम ध्येयवादी असले पाहिजे.