⁠  ⁠

गवंडी काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देखील जिद्दीने स्वप्न पूर्ण करता यायला पाहिजेत. याचे उत्तर उदाहरण म्हणजे अमजद दगडूभाई तांबोळी. शिरूर तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मुखई येथील सामान्य गवंडी काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने जिद्दीच्या ही कहाणी…अमजदच्या घरची परिस्थिती बेताची होती.

वडिलोपार्जित चार एकर शेती…तसा गावात शिक्षणाचा अभाव. त्याचे वडिल शेतीबरोबरच गवंडी काम करत चार पैसे गाठीला बांधून दगडूभाई तांबोळी यांनी अमजदला चांगलं शिक्षण दिले. त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. तर पुढे त्याने बारावीनंतर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अमजद यांनी बीएस्ससी अ‍ॅग्री ही पदवी घेतली.

याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेच्या विषयी समजलं.आपली परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यास करायला हवा. म्हणून त्याने पुढे अहमदनगर येथील राहुरी येथे २ वर्षे एमएस्ससी अ‍ॅग्री पदवी घेतली आणि त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. त्याने स्वतःला शिस्त लावली आणि बारा तास अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळवले. यात अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे होते.अखेर अमजदनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सारा गाव गहिवरून गेला.

Share This Article