⁠  ⁠

पोलिस अकादमी मधल्या स्वयंपाकीचा लेक झाला PSI ; अमोलचा हा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचाच…

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story आयुष्याच्या जीवन प्रवासात यशस्वी होण्यासाठी अपयशाची एकदा तरी पायरी चढावी लागते. हे सत्य नाकारून चालणार नाही. अमोलला देखील या प्रवासात बरेच अपयश आले. पण तो हिंमतीने लढत राहिला‌‌. अमोल अरुण भुवड हा मूळगाव ढाकरवाडी (ता. खेड, जिल्हा. रत्नागिरी) येथील असून तेथील पहिलाच पीएसआय होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

चाकोरीबद्ध शैक्षणिक आयुष्य न जगता त्याने स्पर्धा परीक्षेची वाट धरली. बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलेला अमोल अरुण भुवड याने सरकारी नोकरीसाठी अभ्यास केला.

अमोलचे वडील महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे मुख्य स्वयंपाकी या पदावर कार्यरत आहेत, त्यांचा मुलगा काही दिवसांनी ते कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलिस अकादमी येथेच प्रशिक्षण घेणार आहे. ही त्यांच्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता २०१७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी पीएसआय पदासाठी प्री-लीम, मेन्स, ग्राउंड आणि मुलाखत हे टप्पे पार केले. परंतु ग्राउंड मध्ये कमी गुणांमुळे निवड होऊ शकली नाही.२०१८ ला ही मेन्स परीक्षेत अपयश आले. २०१९ ला पुन्हा तीनही टप्पे पार केले परंतु, केवळ एक गुणांनी यशाने त्याला हुलकावणी दिली. मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा जोमाने तयारी केली व २०२० च्या पोलिस अकादमी परीक्षेत निवड होत त्यांनी यश खेचून आणले आहे.

Share This Article