वसतीगृहात राहून प्रचंड कष्टमय जीवनातून ज्ञानेश्वरची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड !
MPSC PSI Success Story अल्पभूधारक शेतकरी कुटूंब, जेमतेम जमीन, घरची परिस्थिती बेताची त्यामुळे वसतीगृहाचा आधार अशा परिस्थितीत देखील सकारात्मक वाट काढत ज्ञानेश्वरने यश मिळवले आहे. मालेगाव तालुक्यातील खडकी गावातील ज्ञानेश्वर अण्णाजी दुधेकर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे.
ज्ञानेश्वर दुधेकर यांनी खडकीत आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर मालेगाव येथे केबीएच विद्यालयात आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान बारावीनंतर वडिलांनी सांगितले होते की, आता शिक्षण पूर्ण झाले. शेतीकडे लक्ष दिले पाहिजे परंतु आईचे बारावीपर्यंत शिकलेल्या असल्याने वडिलांची समजूत काढली. शिक्षणाचा हा प्रवास सातत्याने चालू ठेवला.त्यांनतर पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.
पण पुण्यात कुठे राहायचे? हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतीगृहाचा आधार घेतला. त्याठिकाणी राहून फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून गणित या विषयात २०१७ वर्षी पदवीधर झाला. पुढे ज्ञानेश्वरने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गाठले. विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. अवघ्या एका मार्कने यशाला हुलकावणीला दिली. मात्र त्यानंतर दरम्यान ज्ञानेश्वरने कष्टाच्या संघर्षात सलग सात विविध पदांसाठी परीक्षाही दिल्या. जिद्दी व चिकाटीने मातज्ञानेश्वरने यशाचा पाठलाग करत अखेर २०२० च्या परीक्षेत फौजदार झाला.