⁠  ⁠

कामगाराच्या मुलाने परिस्थितीचा सामना करत मिळवले पोलिस उपनिरीक्षकपद !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC PSI Success Story : कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. तर त्यासाठी मेहनत व सातत्य हे कायम लागतेच. तसेच गौरव कदम हा नांदगांव येथील रहिवासी. त्याचे वडील सुरेश कदम हे नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करतात. घरची परिस्थिती सर्वसामान्य आणि गरिबी वाट्याला होती. तरी देखील परिस्थितीतून आयुष्याचे सोने गौरवने केले. त्याने वर्दीचे स्वप्न बघितले आणि पोलिस उपनिरीक्षकपदी निवड होऊन साकार पण झाले.

गौरवचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळेत तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये झाले. पुढे त्याने नांदगाव मधल्याच महाविद्यालयात अकरावी – बारावी उत्तीर्ण केली.उच्च शिक्षण घेतले पाहिजे या विचाराने त्याने पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत विज्ञान विषयाची पदवी मिळविला. या दरम्यान त्याला समजले की आपण जर काम केले तर चार पैसे गाठीला येतील. तसेच अजून अभ्यास केला तर अधिकारी होऊ. म्हणून त्याने काम आणि अभ्यास यांचा मेळ घालत अभ्यासाचे नियोजन केले.

आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड सुरू होती. यात त्याला मोठा भाऊ व नातेवाईक व मित्रमंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तो दिवसाला दिवसाला पाच ते सहा तास रविवारी संपूर्ण दिवस असा अभ्यास करायचा. अभ्यास आणि मेहनत करण्यात काही पडला नाही. यामुळेच, त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. तो संपूर्ण कुटुंबातील उच्च शिक्षित आणि पहिला अधिकारी बनला. त्यास पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळाले. गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

Share This Article