⁠  ⁠

पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या लेकीने मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story : खरंतर एमपीएससी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी जिद्द, संयम खूप महत्त्वाची आहे. पण गावातील लेकीने करून दाखवले. माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी मधुकर अनभुले यांची कन्या अर्चना मधुकर अनभुले हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.

अर्चनाची परिस्थिती तशी बेताचीच होती.‌त्यात आई वडील गरीब शेतकरी असल्यामुळे अर्चनाची पुढील शिक्षणाची वाट अवघड होती…जनावरांच्या धारा काढणे,पीकांचे खुरपण करणे, विहिरीतील मोटर चालू करून पिकांना पाणी देणे अशा प्रकारच्या शेतीच्या सर्व कामात आई- वडिलांना मदत करत अशी गावात संपूर्ण जडणघडण झाली. तरी तिने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले‌. तिचे शालेय शिक्षण हे प्राथमिक शिक्षण जगदंबा विद्यालय ढवळस येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण के.एन.भिसे कॉलेज कुर्डूवाडी येथे झाले आहे.

अर्चना हिने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या मुक्त विद्यापीठातून , घरून अभ्यास करून प्रथम बी ए व नंतर एम ए (फर्स्ट क्लास) अशी व्दिपदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू‌ केला. अभ्यासाचे स्वरूप समजून घेतले.पहिल्याच प्रयत्नांमध्ये तिला घवघवीत यश प्राप्त झाले व संपूर्ण राज्यात अर्चना ही मुलींच्या मध्ये दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली व तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

Share This Article