भाग्यश्री जगन्नाथ जाधव ही आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील रहिवासी. तिला लहानपणापासूनच वर्दीची आवड होती. त्यामुळे देश सेवेसाठी एक पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न तिने मनाशी बाळगलं होतं. भाग्यश्रीचे वडील सीआयएसएफ आर्मीमध्ये होते.पण आता सध्या शेती व्यवसाय करतात.
भाग्यश्रीचे प्राथमिक शिक्षण जाधववाडी आपल्या गावातच पूर्ण झाले. त्यानंतर इयत्ता पाचवीसाठी तिने रयत शिक्षण संस्थेचा नरसिंह विद्यालय रांजणी येथे प्रवेश घेतला. त्यावेळी तिला खो- खो विषयी काहीच माहिती नव्हती. परंतु खो-खो खेळाडूंच्या सानिध्यात राहून आणि खो-खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे खो-खो ९ खेळात राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदके पटकावली. तिचे खो-खो खेळामुळे ती पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकले.
ती एक राष्ट्रीय खो-खो खेळाडू असून तिने रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळताना दोन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावली आहेत. तिने खेळाबरोबर अहोरात्र अभ्यास देखील केला. हिने जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले आहे.