⁠
Inspirational

गावचे राहणीमान पण पोरीने पहिल्याच प्रयत्नात मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद !

MPSC PSI Success Story आपल्याला एखादे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर त्यासाठी हिमंत राहून चालणार नाही. त्यासाठी लढावे लागते. तशी गावची परिस्थिती कोणतेही शैक्षणिक वातावरण नव्हते की आर्थिक सुबत्ता नव्हती. तरी देखील प्रतिक्षा राठोड हिने अगदी कमी वयात आणि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रतिक्षाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

प्रतीक्षा हिम्मत राठोड ही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या घरची परिस्थिती जेमतेम. तिला तीन बहिणी आणि एक भाऊ असे कुटुंब.खरंतर तिचा ओढा परिचारिका होण्याकडे होता; परंतु प्राचार्य विनायक भानोसे यांनी तिची हुशारी, आयक्यू लेव्हल व मानसिक स्वास्थ्य बघून तिला स्पर्धा परीक्षेकडे आणि विशेषतः लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी शिक्षण तर हवेच. म्हणून तिने गावातच प्राथमिक शिक्षण घेतले. तसेच तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा जिल्ह्यातील वीर पांगरा येथे झाले. दहावी आणि बारावीलाही टॉपर होती. घरच्यांनी देखील या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

पुढे ती मुक्त विद्यापीठातून बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रतीक्षा व तिच्या तिन्ही बहिणी सुरवातीपासून हुशार. त्यामुळे राठोड यांनी त्यांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. स्वतः अशिक्षित असतानाही मुलीला उच्चशिक्षित केले. तिने फिजिकल ट्रेनिंग घेतले. त्यासाठी तिने काही काळ श्री. रेड्डी यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. अभ्यासासाठी कसून तयारी तर केलीच.

पण मैदानी खेळात पण बाजी मारली. पण तिच्या वडिलांचा ऐन मेन परीक्षेच्यावेळी अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत होऊन ते अंथरूणाला खिळले. पण प्रतिक्षाने हिमंत सोडली नाही. मेहनत आणि जिद्द कायम ठेवली आणि ती पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक झाली. सध्या ती ट्रेनिंगसाठी रूजू झाली आहे.

Related Articles

Back to top button