सायकलपटू प्रियांका कारंडे झाली पोलीस उपनिरीक्षक !
MPSC Success Story : खेळ आणि अभ्यास याचा मेळ घालून यशाची पायरी गाठता आली पाहिजे. हेच सांगलीतील बामणोलीची कन्या प्रियांका शिवाजी कारंडे हिने करून दाखवले आहे.होते…वर्दीचे आकर्षण होते. कारण, तिचे वडील माजी सौनिक होते. ती शिस्त आणि वातावरण तिला नेहमी आपली वाटतं राहिली.
तिची आई गृहणी आहे. आई, वडिलांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.तिला शालेय जीवनापासून खेळात अधिक रस होता.सायकलिंगच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी सायकल घेण्याची परिस्थिती ही नव्हती. सायकल स्पर्धेला जायचे होतं तेव्हा कोणीही मदतीला धावलं नाही. आईचं मंगळसूत्र गहाणवट ठेऊन कर्ज काढण्याची वेळ आली. वडीलांनी कर्ज काढले व सायकल स्पर्धेसाठी दोन लाखाची सायकल घेतली.
यात तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. यासाठी तिला शासनातर्फे गौरविण्यात देखील आले आहे. पुढे तिने पदवीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिनं पोलीस भरती परीक्षेतही प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी हुलकावणी मिळाली. शेवटी अभ्यास करून अधिकारी होण्याचा निश्चय केला. यात तिला यश मिळाले.
पोलीस भरतीत यशाची हुलकावणी ही तिच्या आयुष्यातील कलाटणी ठरली. बामणोली या छोट्याशा खेडेगावातून महिला पोलीस उपनिरीक्षक होऊन प्रियांकाने मिरज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियांकाचे सायकलपटू असून खाकी वर्दी मिळवायचं तिचं स्वप्न पूर्ण झालंय.