⁠
Inspirational

जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या राहुलची पोलिस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

MPSC PSI Success Story : गावातला एक तरी मुलगा उच्च पदावर गेला तर साऱ्या गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरते. तसेच राहुल कोरडेने देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.कोणत्याही गोष्टीचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसेच स्पर्धा परीक्षेत सुध्दा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत तर घ्यावी लागतेच. पण संयम पण महत्त्वाचा आहे.

राहुलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कोरडा येथे झाले. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण गोरेश्वर माध्यमिक विद्यालय गोरेगाव येथे झाले. अकरावी व बारावीचे वर्षे त्यासाठी कलाटणी देणारे होते. त्याचे हे शिक्षण हनुमान विद्यालय टाकळी, खातगाव याठिकाणी झाले. याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि माहिती मिळाली. त्यामुळे, त्याने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.पदवीचे शिक्षण घेण्यासाठी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ऍडमिशन घेतले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा प्रवास देखील सोप्पा नव्हता.

२०१९ च्या परीक्षेत पूर्व मुख्य परीक्षा दिल्या, परंतू मुलाखतीसाठी निवड झाली नाही. त्यानंतर पुन्हा प्रयत्न करून २०२० च्या परीक्षेत पूर्व मुख्य परीक्षा देऊन मुलाखत दिली, परंतु दोन ते तीन मार्क वरून माझा नंबर आला नाही. पुन्हा २०२१ च्या परीक्षेत पूर्व मुख्य पास करून मुलाखतीत माझी निवड झाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगा ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासात सातत्य ठेवून यश मिळवले हे सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

Related Articles

Back to top button