कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

Published On: एप्रिल 14, 2025
Follow Us
police

MPSC Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर मुक्ताईनगर येथील राऊष संजीव वाढे याने कोणताही क्लास न लावता बाजी मारली. त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.

राऊष यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण मुक्ताईनगर शहरात मिरवणूक काढून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे कोणतेही क्लासेस न लावता स्वकष्टातून व प्रचंड चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

त्यांनी बेसबॉल या खेळांमध्ये सहभाग घेवुन राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चुणुक दाखविली. बेसबॉल या खेळात दोन वेळा राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारुन दोन वेळा सुवर्ण पदक प्राप्त केले. शिक्षणासोबतच त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु ठेवला. कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता त्यांनी हे यश संपादन केले. ते जे.ई. स्कूल व ज्यु. कॉलेजचे क्रीडाशिक्षक संजीव वाढे यांचे पुत्र आहे. यशाचे श्रेय ते आई, वडील, बहिण, भाऊ व मार्गदर्शक शिक्षकांना देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025

परदेशातील नोकरी सोडून मायदेशी परतला; पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक

मार्च 15, 2025