MPSC PSI Success Story : घरची परिस्थिती तशी सामान्य, कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही तरी देखील योगेश अनिल धामुनसे याने करून दाखवलं. योगेशचे वडील अनिल तान्हू धामुनसे यांचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत तर गृहिणी असलेली आई भिमाबाई अशिक्षीत आहेत. संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे.योगेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिर्डोशी येथे झाले. पाचवी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी विद्यालयात तर अकरावी बारावी भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले.
अनंतराव थोपटे महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्स मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. पुढे त्याने पुण्यात राहून कायद्या विषयीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिक्षण दिले. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. क्लासमधून आपला शैक्षणिक खर्च आणि इतर पुस्तकांचा भागत होता. त्यामुळे त्याला पुण्यातून अभ्यास करणे शक्य झाले. त्याने एकच ध्यास घेतला होता की वर्दी.
त्याला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते.घरात शिकलेले कोणही नसताना योगेशने जिद्द, चिकाटी व अपार मेहनत केली.भोर तालुक्यातील दुर्गम असलेल्या हिर्डोशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील योगेश अनिल धामुनसे याने त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून ३३६ मार्क मिळवत ६४ रँकने उत्तीर्ण झाला.