MPSC PSI Success Story आजच्या आधुनिक युगात देखील गावाकडे अजूनही अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत देखील उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होऊन दाखवणे…यासाठी हिमंत लागते. सिन्नर तालुक्यातील कोनांबे या गावची मनिषा वाळू डावरे ही लेक. लहानपणापासून शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या मनिषाने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. तिचे शालेय शिक्षण हे गावाकडेच झाले. त्यानंतर दहावी झाल्यानंतर सिन्नरला बारावी सायन्स शिकली. तिने मग फाॅर्मसी साईट घेतली. त्यात करिअर करायचे ठरवले. चिंचोलींच्या प्रवरा काॅलेजमध्ये बी फाॅर्मसी पूर्ण केले.
या काळात तिचा परिवाराने मनिषा लग्न करून देण्याचा निर्णय घेतला.विवाहासाठी इच्छुक स्थळ शोधण्यास सुरुवात केली. मात्र करोना काळ सुरू असल्याने ही प्रक्रिया थांबली अन् मनिषाला जणू यशाची चाहूल लागली.सिन्नर शहरात असणाऱ्या अभ्यासिकेत वडिलांनी जाण्यास परवानगी दिली.
उच्च शिक्षण झाले म्हणून मुलींचे लग्न करायचं ठरले अन् करोना महामारी संकट पुढे आले. त्यामुळे पालकांनी पुढे इच्छेनुसार कॅरिअर करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. तिने इतिहास घडवणारा ठरला आहे. उच्च शिक्षित मुलींच्या आयुष्यात हा क्षण सोनेरी झाला आहे.