---Advertisement---

अपयशाचे झटके सहन करीत शेतकरी पुत्र झाला पोलिस उपनिरीक्षक !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अशक्य असे काहीच नाही. कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने यश‌ मिळवता येते, हे प्रसाद विध्वंस याने करून दाखवले आहे. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली याठिकाणी राहणारा हा शेतकऱ्याचा मुलगा.

त्याची परिस्थिती तशी बेताचीच… जेमतेम तीन ते चार एकर शेती जमीन आहे. यातून मिळालेल्या तुटपुंज्या कमाईवर त्यांनी मुलाचे शिक्षण केले. त्याचे प्राथमिक शिक्षण हे मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे झाले. त्यांनतर पाचवी ते दहावीचे शिक्षण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड येथील वसतिगृहात राहून घेतले.

---Advertisement---

पुढे पदवीपर्यंत शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले. घरापासून दूर राहून संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. त्यातही त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. सुरूवातीला अपयश आले पण त्याने संयमाने करून दाखवले.

२०२२ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत पूर्व, मुख्य परीक्षा व ग्राउंड यशस्वी झाल्यानंतर मुलाखतीत चार गुणांनी ही पोस्ट हुकली. परत, २०१९ च्या फॉरेस्ट गार्ड परीक्षेत दोन गुणांनी ही पोस्ट हुकली. सातत्याने अपयश येत होते. तरी, त्याने अभ्यास चालू ठेवला.अखेर, त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.त्यांची ग्राउंडची तयारी सुरू असताना तलाठीपदी नुकतीच निवड झाली होती.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts