⁠  ⁠

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story : आपली परिस्थिती बदलणं आणि त्यासाठी मेहनत करणं हे आपल्याच हातात असतं. हेच भाजी विक्रेत्या दाम्पत्याचा मुलगा प्रशांत बबन दांगट याने करून दाखवले आहे. निरगुडसर (ता.आंबेगाव)भाजी विक्रेत्या दाम्पत्याचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

त्याचे शालेय शिक्षण हे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगडेवाडी, रत्नभूमी विद्यालय रामजी नगर घाटकोपर, माध्यमिक शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे झाले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठरवले होते की आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी धडपड करायचीच.

पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे बीएससी पदवी प्राप्त केली. नंतर, आबेदा इनामदार कॉलेज पुणे येथे एमस्सी पदवी प्राप्त केली आहे. लांडेवाडी येथील कॉलेजला बीएडचे शिक्षण पूर्ण करून काही काळ गेनबा मोझे कॉलेज येथे शिक्षकाची नोकरी केली. ही शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्याने अभ्यास चालू ठेवला. २०२० साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती पण ४ गुणांनी त्याची निवड हुकली होती नंतर पुन्हा त्याच जोशाने अभ्यास करून पुन्हा पोलिस उपनिरिक्षक ( पी एस आय ) २०२२ ची परीक्षा दिली. हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक झाला. हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. जोमाने अभ्यास करत हे यश मिळवून दाखवले आहे.

Share This Article