---Advertisement---

वडिलांनी रंगकाम करून घडवले आणि लेकीने पोलिस उपनिरीक्षक बनून कष्टाचे चीज केले….

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : घरची परिस्थिती बेताची… लहानपणापासून गावातील जडणघडण,‌वडील रंगकाम करायचे त्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. त्या परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द आणि चिकाटी यावर प्रतिक्षा खोब्रागडे या मुलीने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण झाले.

प्रतिक्षा ही मूळची सावर्डी या गावची लेक. तिचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले. तर उच्च शिक्षण हे अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयात पूर्ण झाले. तिने पदवी शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा ध्यास घेतला‌. कला या शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले.या काळात तिने वेळ वाया न घालवता फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

---Advertisement---

पहिल्यांदा २०२० मध्ये एमपीएससीच्या परीक्षेसाठी प्रयत्न केला.‌तेव्हा तिला अपयश आले. पण या अपयशाला सामोरे जात…. पुन्हा तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. तिने २०२२ मध्ये अराजपत्रित दुय्यम अधिकारी पदासाठी संयुक्त परीक्षा दिली. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करून २९० गुणांसह या परीक्षेत उत्तीर्ण झाली. ती पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी पात्र ठरली. एवढेच नाहीतर तिने सावर्डे या गावाचे नाव रोशन केले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts