⁠  ⁠

इंजिनिअर ते पीएसआय ; वाचा सचिन पाटीलचा अनोखा प्रवास!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story पोलिस वर्दीचे स्वप्न स्वस्त बसून देत नाही, हे अगदी खरे आहे. लहानपणापासून सचिनला पोलिस खात्यात जायचे होते.‌ आपण पोलिस व्हावे, हे त्याचे स्वप्न होते. त्याआधी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे, हे स्वप्न उराशी बाळगून त्यानुसार वाटचाल केली.

सचिन बाळगोंडा पाटील हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील आहे. वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त कर्मचारी बाळगोंडा पाटील यांचा हा मुलगा. त्यांनी शालेय शिक्षण महागावमधील श्री शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. गडहिंग्लजच्या साधना ज्युनिअर कॉलेजमधून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक तर कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी कॉलेजमधून मॅकेनिकलची पदवी प्राप्त केली.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन‌ ही तयारी करायचा. रोजच्या मैदानावरील सरावा आणि वाचनाचा फायदा त्याला मुख्य परीक्षेच्या वेळी झाला. २०२० मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेतून महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय पदी निवड झाली.

Share This Article