---Advertisement---

१२वीत अपयश; परंतु एमपीएससीमध्ये पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश, तुषार बनला पीएसआय

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : आयुष्यात यशस्वी होणं न होणं हे परिस्थिती नव्हे तर जिद्द ठरवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुषार घोगरे. प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे अत्यंत महत्त्वाचे असते बारावीची परीक्षा ही आयुष्याचा टर्निंग पॉईंट मानले जाते, परंतु तुषार च्या बाबतीत हे गणित काहीसे उलटे आहे. बारावीत अपयश परंतु एमपीएससी मध्ये पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाचा प्रवास जाणून घेऊया.

घरची परिस्थिती बेताची,वडील शिपाई कामगार आईचे कोरोनाच्या काळात झालेले निधन, तसेच एक बहिण तेही अपंग, अशा बिकट परिस्थितीवर मात करत सगळ्यात अवघड मानली जाणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केलेल्या यशापासून ते पीएसआय बनण्यापर्यंतचा हा धुळ्यापासून सुरू झालेला तुषार घोगरेचा प्रवास.

---Advertisement---

परीक्षेत अपयश मिळाल्याने अनेक विद्यार्थी हे टोकाचे पाऊल उचलतात परंतु बारावीत सर्व विषयात नापास झाल्यानंतरही तुषार यांनी जिद्द, सातत्य, आत्मविश्वासाच्या बळावर एमपीएससी सारख्या परीक्षेत प्रथम प्रयत्नातच यश मिळवणं हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे.

तुषार याने आपल्यातले गुण शोधून त्यावर काम करून यशाचे हे उंच शिखर गाठले आहे. तुषार हा मल्लखांब खेळाडू देखील आहे. तसेच याने पंजाब मधील पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक ग्वाल्हेर येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत कास्यपदक मिळवलेले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts