MPSC Success Story : आपल्या बिकट परिस्थितीत देखील गावातच राहून अभ्यास करून अधिकारी होणं…ही काही सोप्पी गोष्ट नाही. यात खूपदा निराशा येते तर सोयीसुविधा नसल्याने प्रवास थांबवावा असे देखील वाटते. पण त्याने ते करून दाखवले. त्याचे आई – वडील दोघेही शेतीकाम करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. पण उच्च शिक्षण घेण्याच्या ध्यासाने त्याने कॉम्प्युटर सायन्स पदवीपर्यंत शिक्षण घेतले.
त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्याने कॉलेज मध्ये असताना पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्नं पाहिलं.फक्त स्वप्नं पाहून न थांबता त्याने ते स्वप्नं पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू केला. गावाच्या आसपास कोठेही आवश्यक सोयीसुविधा नव्हत्या. म्हणून त्याने शिरूर तेथे अभ्यासिका लावली. पहिल्यांदा त्याला अभ्यास अवघड वाटला. हे सगळं सोडून द्यावं वाटलं. पण त्याने मेहनतीने अभ्यास केला.ठेवला.त्याने २०१९ ला पहिली पूर्व परीक्षा दिली परंतु अपयश वाट्याला आले. या अपयशाने खचून न जाता त्याने आपले प्रामाणिक प्रयत्न चालूच ठेवले.
२०२० ला त्याने पुन्हा पूर्व परीक्षा दिली आणि यावेळी परीक्षेत यश मिळाले.परंतू मैदानी चाचणीत अपयश आले. जेव्हा अपयश यायचे तेव्हा त्याला डोळ्यासमोर परिस्थिती यायची. पण तो पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायचा. या काळात आईवडील त्याला या काळात लढण्याची प्रेरणा देत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.यामुळेच, शेतकरी कुटुंबातल्या वैभव जालिंदर वाघमारे या माझ्या देवदैठण गावातील वैभवची पी.एस.आय पदी निवड झाली.