⁠
MPSCMPSC Exams

मोठी बातमी ! 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा या तारखेला होणार

राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा (MPSC Exam) आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

काय म्हटलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता दिनांक ०८ मे, २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण ५२४ रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.१३७/आरक्षण-०५, दिनांक २८ मे, २०२४ अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ दिनांक ०६ जुलै, २०२४ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येईल.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ परीक्षेकरीता जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वगा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज स करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-

(१) संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील “My Account” सदराखाली प्रस
परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या Link समोर दर्शविण्यात आलेल्या “Question या बटनावर क्ल्कि रून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील. २) इतर मागास वर्गाचा दौवा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.
(३) इतर मागास वर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) चाल अनुज्ञेय होणार नाही.
(४) इतर मागास वर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादस करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर द बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टण्यावर मान्य करण्यात येणार नाही.
(५) इतर मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरण उमेदवार ऑनलाईन अर्जप्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकर (जा.क्र ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या Link च्या आधारे इतर मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

Related Articles

Back to top button