लहानपणी वडील वारले, आईने मोलमजूरी करून शिकवले; बिकट परिस्थितीचा सामना करून मुलगी बनली विक्रीकर निरीक्षक!
MPSC STI Success Story : आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक येतात तर खूपदा परिस्थिती सोबत सामना करत लढावे लागते. अशीच बिकट परिस्थिती विद्या कांदे या शेतकऱ्याच्या लेकीवर आली. पण तिने परिस्थितीला सामना केला आणि दिवसरात्र अभ्यास करून एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
विद्याने सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. दहावी झाल्यानंतर वणीच्या नवोदय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. हिंगोली जिल्ह्यातील मौजे साखरा येथील विद्या कांदे या शेतकऱ्याच्या मुलींने आपल्या आईच्या कष्टाची जाण ठेवली.
लहानपणीचं विद्याचे वडील वारले त्यामुळे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली. तिच्या आईने देखील मुलांसाठी मोलमजूरी केली. मोठ्या कष्टाने उच्च शिक्षित केले.मोठे झाल्यानंतर शिक्षणाचा खर्च वाढला परिणामी विद्याच्या भावाला म्हणजेच विकासला शिक्षण सोडावे लागले.
मात्र विकास कांदे यांनी आपल्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे विद्या यांच्या यशामागे त्यांच्या बंधूंचे मोठे कष्ट दडले आहेत.घरच्यांना मदत मिळावी म्हणून विद्याने देखील ग्रामीण डाक सेवक पदावर कार्यरत असतानाच तिने एमपीएससीसाठी तयारी केली.कठोर मेहनतीच्या जोरावर एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश संपादित केले आहे.
विद्याने २०२१ मध्ये एसटीआय पदासाठी परीक्षा दिली होती.ती सकाळी नोकरी करायची व त्यानंतर आईला मदत मग रात्रभर अभ्यास असा दिनक्रम होता.या मेहनतीच्या जोरावर ती एमपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली असून एसटीआय पद मिळवले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तिने मुलींमधून सहावा क्रमांकप टकावला आहे.शेतकऱ्याच्या लेकीने एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या साऱ्या गावाचा आणि कुटूंबाचा ऊर भरून आला.