---Advertisement---

शेतकरीपूत्राची कृषी अधिकारी पदाला गवसणी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story जेव्हा शेतकऱ्यांचा मुलगा कृषी अधिकारी होतो, हे गावासाठी आणि शेतकरी कुटुंबासाठी अभिमानाची बाब असते. आदेश नंदकुमार खाटीक याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. ज्या शेतीत काबाड कष्ट केले, त्या मातीशी इमान राखायचे ही जिद्द उराशी बाळगून आदेश याने पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारी पदालाही गवसणी घातली आहे.

आदेश हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील पाथरवाला या लहानशा गावातील रहिवासी. आई- वडील दोघेही शेतकरी. लहानपणापासून आदेश देखील शेतीची कामे करत मोठा झाला. आदेशने २०१७ ते २०२१ दरम्यान कृषी महाविद्यालय, बाभूळगाव येथून कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

कृषी महाविद्यालय,पुणे येथे कृषी किटकशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. बाभूळगाव येथे शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षापासूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवेचा अभ्यास करत होता. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून दिशा दिली की ते नक्कीच स्पर्धेत उतरतात हे आदेशने दाखवले आहे.

आदेशच्या यशामुळे जगदंबा संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे. जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदेश नंदकुमार खाटीक यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts