सर्वसामान्य कुटुंबातील लेकीच्या जिद्दीला सलाम ; बनली पोलिस उपनिरीक्षक!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story सामान्य घरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीने मिळवलेले‌ यश हे अनेकांना प्रेरणादायी ठरते. तसाच आफ्रिनचा प्रवास आहे.

आफ्रिन मेहबूब बिजली ही मूळ कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील किणी येथील आहे. आफ्रिनचे प्राथमिक शिक्षण किणी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल पूर्ण झाले. तर, उच्च माध्यमिक कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात झाले. नंतर तिने पदवीचे शिक्षण सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात घेतले.

सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या आफ्रिन हिने अतिशय जिद्दीने अभ्यास करत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने दररोज नित्यनेमाने वाचन केले. तर, तिच्या चुलत काकांचे देखील यासाठी तिला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे चुलत काका हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याने वेळोवेळी तिला पाठिंबा देत आले. यामुळे, तिचा आत्मविश्वास देखील वाढला आणि अभ्यास करायला अधिक बळ मिळाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या सुमारे ५६० पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

Share This Article