MPSC Success Story : परांडा तालुक्यातील रोसा येथील अजिंक्य गोडगे हा शेतकऱ्यांचा पुत्र. त्यांने लहानपणापासून शेतीची कामे करत शिक्षण घेतले. वडील देखील तुटपुंज्या मजूरीवर घर चालवायचे. हे चित्र बदलायला हवं, हे मनाशी पक्के करून त्याने झपाट्याने अभ्यास केला.
अजिंक्यचे प्राथमिक शिक्षण परांडा येथे सरस्वती प्राथमिक विद्यालयात पूर्ण झाले. तर माध्यमिक शिक्षण बार्शी येथे महाराष्ट्र विद्यालयात झाले. त्याने पुढे वडाळा जिल्हा सोलापूर येथील लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम.एस्सी बायोकेमिस्टीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने २०१६ पासून चार वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने संपूर्ण तयारी पुण्यातून केली. सलग चार वर्षांच्या सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदी शिफारस करण्यात आली आहे.