⁠  ⁠

शेतकरी कुटुंबातील अक्षय झाला वन परिक्षेत्र अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : आपली परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच अक्षयला परिस्थितीने घडवलं आणि स्वप्न बघण्यासाठी उभं देखील केलं. अक्षय अकरावीला असताना वडिलांचे निधन झाले.‌ हक्काचा आधार गेल्याने संपूर्ण जबाबदारी ही आईवर आली. पण आईने खंबीरपणे मुलाला घडवलं… नुसतं घडवले नाहीतर उच्च शिक्षित केले.

अक्षय बाळू लांभाते हा मूळचा जारकरवाडी आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र.प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा जारकरवाडी येथे झाले त्याने येथीलच आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीला ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. लहानपणापासून अक्षयला अभ्यासाची गोडी होती. पण अकरावीत असताना वडिल गेल्याने बेताच्या परिस्थिती मध्येही त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले.

महात्मा गांधी विद्यालय (मंचर ) येथे त्याने बारावीला ८० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय आला पुढे पुणे येथील पी.व्ही.जी. कॉलेजमधून प्रिंटींग इंजिनिअरिंग पदवी संपादन केली. त्याला त्यांनी पूर्णपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती. पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि हातभार लावण्यासाठी त्याने मुंबई या ठिकाणी प्रिंटींग क्षेत्रातील खाजगी कंपनीत नोकरी केली. नोकरी करत असताना त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. नोकरी व अभ्यास जमतं नसल्याने त्याने अडीच वर्ष नोकरी केल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ अभ्यास केला. या संघर्षाला फळ मिळाले. त्याने पहिल्याचा प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२१ मध्ये राज्यात १६ वा क्रमांक मिळविला असून त्याची वन परिक्षेत्र अधिकारी पदी निवड झाली आहे.सध्या त्याचे ट्रेनिंग सुरु आहे.

Share This Article