नक्षलग्रस्त भागातील लेकीची MPSC परीक्षेत बाजी ; वाचा अश्विनीच्या यथोगाथेचा प्रवास..
MPSC Success Story : कोणत्याही सोयीसुविधा नाही…. संपूर्ण नक्षलवादी परिसर आणि दुर्गम भाग. या दुर्गम भागातील मुले परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा देण्याचे धाडस करत नाही. पण शिक्षण घेतले तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते हे अश्विनीने दाखवून दिले आहे. तिच्या या यथोगाथेचा प्रवास वाचा….
बिड्री गावातील अश्विनी अशोक दोनारकर या युवतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची कर व मंत्रालयीन सहायक पदी वर्णी लागली आहे. अश्विनीचे वडील सामान्य शेतकरी, तर आई गृहिणी असून तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या येमली येथील हायस्कूलमधून पूर्ण केले.
यासाठी तिला रोज पायपीट करावी लागे, पुढे महाविद्यालयीन शिक्षण तसेच बीएस्सी, बीएड हे पदवीचे शिक्षण तिने गडचिरोलीत शासकीय वसतिगृहात राहून पूर्ण केले.
आपल्याला ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त शिक्षण घेऊन चालणार नाहीतर सरकारी अधिकारी पण व्हायला हवे, ही मनीष उराशी बाळगून अश्विनीने मेहनत घेतली. रोजच्या रोज वाचन, सराव आणि लेखन यामुळे तिला कर व मंत्रालयीन सहायक पद मिळाले आहे.