MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश हे आलेच. त्यामुळे त्याला सामना करून नव्याने सुरूवात वेळीस करता आली पाहिजे. तसेच भारती पाटील हिचा बारावीनंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला. पण तिने प्रवेश न घेता गणितात बी. एस्सी करणाऱ्यांचा निर्णय घेतला. कारण, तिला स्पर्धा परीक्षा द्यायची होती.
‘एमपीएससी’मध्ये पहिल्या दोन प्रयत्नात तिला काहीसे अपयश आले व त्यामुळे खचून न जाता तिने आपले प्रयत्न सुरुच ठेवला. भारती पाटील ही धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील लेक. भारती ही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांची मुलगी आहे. तिने जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून २०१८ मध्ये गणितात बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
आपल्या वडिलांची परिस्थिती, लहान भावाचे शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून कमीत कमी खर्चात शिक्षण घेता यावे यासाठी तिने इंजिनिअरिंग न करता, बी. एस्सी.ला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा ध्यासत्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला. २०२२ मध्ये दिलेल्या परीक्षेत तिने अखेर यश संपादन केले. २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती.
मात्र, मैदानावर सरावात तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने ही संधी हुकली होती. तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधकपदाच्या (सहकार) परीक्षेत यश संपादन केले.