⁠  ⁠

दिवसरात्र काबाडकष्ट करून दोन्ही भाऊ झाले अधिकारी; हालाखीच्या परिस्थितीत मिळवलेलं यश!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story शेतीवर घरचा खर्च निघायचा नाही, आसपास कोरडा दुष्काळ, आर्थिक परिस्थिती बेताची…अशा वातावरणात उच्च शिक्षण कसे घ्यावे? उदरनिर्वाह कसा करावा? त्यामुळे, संपूर्ण लोंगणे कुटूंब दिवसरात्र जागून कष्ट करायचे. याही परिस्थितीतबापूराव लोंगणे या शेतकऱ्याने दिवस-रात्र काबाड कष्ट करत मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलांनी देखील कष्टाची जाणीव ठेवून या अपार कष्टाचे चीज केले.

आपला मुलगा अधिकारी व्हावा असे स्वप्न पाहिलेल्या आपल्या आई, वडीलांचे स्वप्न सत्यात उतरवले. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्ञानेश्वर बापूराव लोंगणे व सुनील देविदास लोंगणे या सख्या चुलत भांवडांनी पहिल्याच प्रयत्नात नेत्रदिपक यश संपादन करून आपल्या गावचे नाव लौकिक केले असून शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी- एक या पदावर आपले नाव कोरले आहे.

लोंगणे कुटूंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील आहेत. या लोंगणे परिवारातील ज्ञानेश्वर बापूराव लोंगणे व सुनील देविदास लोंगणे या दोन सख्या चुलत भावांनी दाखवून दिले असून इतरांसाठी ते आदर्श ठरले आहेत. या दोन्ही या भांवडाचे प्राथमिक शिक्षण हे, गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे, गावात शिक्षणाच्या अधूनिक सुविधा नसल्यामुळे बापूराव लोंगणे यांनी आपल्या मुलांचे पुढील शिक्षण उदगीर येथे केले. पशुवैद्यकीय शिक्षण हे मुंबई येथे पूर्ण केले.ही भांवडे अगदी लहान पणापासूनच शिक्षणात हुशार होती. बापूराव लोंगणे यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतात काबाडकष्ट करून नियोजन करत पैसे पुरविले.कोणतेही खासगी शिकवणीचे वर्ग न लावता रात्रीचा दिवस करून अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी ही पदे मिळवली आहेत.

मित्रांनो, आपण आपल्या गरीबीचे भांडवल न करता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. हे यश आदर्शवतच असते. फक्त कष्ट करण्याची तयारी आणि परिस्थितीची जाण हवी.

Share This Article