वेळप्रसंगी सायकल रिपेरिंग केली, पण शिक्षणाची कास धरून मिळवले क्लास वन अधिकारी पद !

Published On: नोव्हेंबर 7, 2023
Follow Us

MPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की काही गोष्टींसाठी तडजोड ही आलीच. या प्रवासात सातत्याने अभ्यास करणे महत्वाचे आहे. हा जर अभ्यास असेल तर यश हमखास मिळते. अशाच, धांडेवाडी – कर्जत येथील दीपक राजेंद्र धांडे या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले.

दीपकची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.आई आणि वडील दोघे शेतकरी आहे. अशाही परिस्थितीत
त्याने शिक्षण पूर्ण केले.‌ त्याने माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण कर्जतमध्ये घेतल्यानंतर पुढील कृषी पदवीचे शिक्षण शिवाजीनगर पुणे येथे पूर्ण केले. बारावीपर्यंत दीपकने सायकल रिपेरिंगचे काम करीत शिक्षण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१७ पासून दीपक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत परीक्षा देत होता.

या दरम्यान कोरोना संक्रमणातील लॉकडाऊन काळात त्याने मार्केटमध्ये भाजी-पाला विकत आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण केला. शेवटी २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याने यश मिळवत महाराष्ट्रात ९६ वा क्रमांक पटकावला.विशेष म्हणजे दीपक याने राज्यसेवा मार्फत झालेल्या मुलाखतीमध्ये सर्वाधिक ७० गुण मिळवले आहेत. सध्या त्यांचे यशदा येथे अधिकारी बनण्याचे ट्रेनिंग चालू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025