⁠
Inspirational

कौतुकास्पद..! बेताच्या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी!

संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून… लहानपणापासून अभ्यासाची आवड…बेताची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये देखील यश मिळवणे हे कौतुकास्पद बाब आहे. हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील ज्ञानेश्वर प्रल्हाद घ्यार हा ३० वर्षे तरुण उपजिल्हाधिकारी संवर्गातील परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

ज्ञानेश्वर घ्यार यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले आहे. प्राथमिक शिक्षण मुळगाव साटंबा येथेच झाले असून त्यानंतर त्यांनी दहावी, बारावी हे शिक्षण सुद्धा हिंगोली जिल्ह्यात झाले आहे.दहावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी भांडेगाव येथे पूर्ण केली. त्यानंतर अमरावती येथे डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना त्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले. पदवीचा अभ्यास, रोजचे स्पर्धा परीक्षेचे वाचन आणि लेखन हा नित्यक्रम चालू ठेवला.

स्पर्धा परीक्षेच्या सर्वच छोट्या-मोठ्या पदाच्या परीक्षा देण्यास सुरू केले. यातच दोन वर्षांपूर्वी त्याला भारतीय टपाल खात्यात डाक सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळाली.चंद्रपूर जिल्ह्यात डाक सहाय्यक म्हणून काम करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सुरू ठेवले. त्यानंतर, त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपाधिक्षक भूमी अभिलेख या पदाची परीक्षा सुद्धा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. याच पदावर ते नांदेड येथे कार्यरत असताना…आपण अजून चांगल्या पदाचा अभ्यास केला तर क्लास वन पद नक्कीच मिळेल. हा निर्धार गाठीशी ठेवला.

त्यानंतर पुन्हा दीड वर्षांपूर्वी झालेल्या राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज केला. त्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्याने मुलाखतीत सुद्धा चांगले गुण प्राप्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालात त्याला उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदावर गवसणी घातली. या संपूर्ण प्रवासात त्याच्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. कुटुंबाने नेहमीच “तू सुद्धा अधिकारी होऊ शकतो”, हा विश्वास दाखवला. त्यामुळे त्याला देखील बळ मिळाले.शेतकरी कुटुंबात वाढलेला आणि घरात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदाचा कोणताही कौटुंबिक वारसा नसताना सुद्धा उपजिल्हाधिकारी पद मिळवले. ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे.

Related Articles

Back to top button