---Advertisement---

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी ; वाचा तरुणाच्या जिद्दीची कहाणी!

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

MPSC Success Story : प्रत्येकाला आयुष्यात कधी यश मिळते तर कधी अपयश मिळते. त्याने अपयशानंतर जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला. जिल्हा परिषद, जिल्हा निवड समितीच्या परिक्षेत अपयश आल्यानंतर खचून न जाता त्याने जिद्दीने अभ्यास सुरु ठेवत थेट लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यास सुरुवात केली. त्या परीक्षेत यश मिळवून देखवले.असा हा, सुकी येथील शेतक-याचा मुलगा एकनाथ काळबांडे उपजिल्हाधिकारी बनला.

बबनराव काळबांडे यांचा हा सुपुत्र. त्याचे वडील पुर्णा तालुक्यातील सुकी येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. हे एकनाथ हे बालपणापासून अभ्यासात हुशार असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची आवड पाहून वडील बबनराव यांनी एकनाथ यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

तिथल्या गावाजवळ असलेल्या धनगर टाकळी येथील प्राथमिक शाळेत शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर परभणी जिल्हा परिषेदेचे तत्कालीन अधीक्षक ज्ञानेश्वर शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या घरी राहून परभणीच्या मराठवाडा हायस्कूलमध्ये नववी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे, एका खासगी वसतीगृहात अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डी. एडचा पर्याय समोर असतानाही त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेत परभणी येथील संत तुकाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. याठिकाणी तत्कालीन प्रा.विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी घेतली.

या पदवीच्या अभ्यासोबत एकनाथ यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला होता.घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि बहिण, भाऊ यांचे शिक्षण सुरु असल्याने हाती नोकरी असावी म्हणून एकनाथ यांनी एलआयसी विभागातील परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले.

अशातच २०१० मध्ये भारतीय जिवन विमा निगम मध्ये सहायक पदासाठी परिक्षा घेण्यात आली. त्याच देखील त्याला यश मिळाले पण उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्याला खुणावत होते. परत त्याने जिद्दीने अभ्यास चालू केला. नोकरी करत अभ्यासात सातत्य ठेवले. यामुळे वेळेचे व्यवस्थापन साधले. याचेच फलित म्हणून त्याला उपजिल्हाधिकारी पद मिळाले. हे नुसते पद नाही तर गावासाठी कौतुकास्पद कामगिरी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts