⁠  ⁠

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पी.एस.आय

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : घरी जेमतेम शेती, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, शेतीवरचे उत्पन्न असे असले तरी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शेटफळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा अमित गौतम लबडे पी.एस.आय झाला आहे. ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

तो शाळा शिकत असताना सुद्धा वेळ मिळेल जेव्हा वडिलांना शेतीकामात मदत करायचे. त्याने शेतीकाम व इतर कामे सांभाळून देखील अभ्यास मात्र सोडला नाही. अभ्यासाची काम कायम ठेवली. अमितचे प्राथमिक सातवी पर्यंतचे शिक्षण शेटफळ गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल या ठिकाणी होऊन त्याने शास्त्र शाखेत पदवीचे शिक्षण घेतले.पदवी परीक्षा झाल्यानंतर त्याने पोलिस खात्यात जाण्यासाठी तयारीला सुरुवात केली.

मैदानी सराव व रोजचे वाचन हा दिनक्रम चालू असायचा‌. याच कष्टाचे चीज झाले आणि शेटफळ, तालुका – करमाळा येथील अमित गौतम लबडे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. गावातील अत्यंत सामान्य घरात जन्माला आलेला, घराची परिस्थिती गरिबीची, दिवसभर शेतात काम करून अभ्यास करणं ही खरी तारेवरची कसरत असते. पण त्याने ती गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारली आणि हे यश संपादन झाले.

Share This Article