⁠
Inspirational

वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; कल्याणीची सहाय्यक नगररचनाकार पदी निवड!

MPSC Success Story : कल्याणी लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिच्या आजोबा – वडिलांना नेहमी वाटायचे की तिने सरकारी अधिकारी व्हावे. या विश्वाससाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने देखील अहोरात्र मेहनत घेतली…जिद्दीने सहाय्यक नगररचनाकार झाली. कल्याणी ही मूळची बागलाण तालुक्यातील खिरमणी गावची लेक. तिचे प्राथमिक शिक्षण ते अगदी बारावीपर्यंतचे शिक्षण मालेगावमध्ये झाले. त्यानंतर तिने बी.टेकची पदवी घेतली. हे शिक्षण घेत असताना तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.

तिने परीक्षेचा अभ्यास,‌ नियोजन आणि परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या. त्यानुसार तिने तयारी केली. काही वर्षांपूर्वी तिचे वडील संजय भदाणे वारले….तिचे वडील वीज वितरण कार्यालयात कामास होते. त्यांचे‌ स्वप्न होते की‌ मुलीने खूप शिकावे आणि उच्चशिक्षित होऊन सरकारी अधिकारी व्हावे. या स्वप्नांसाठी तिने देखील मेहनत घेतली आणि तिची एमपीएससीच्या परीक्षेत सहाय्यक नगररचनाकार पदी निवड झाली.

अनेक संकटांना सामोरे जाऊन स्वतःला सिद्ध करून उत्तुंग यश मिळवता येते…याचे हे उत्तम उदाहरण. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पितृछत्र हरपून देखील शालेय शिक्षणानंतर जिद्दीने उच्च शिक्षण घेतले. वडील, आई व संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे.

Related Articles

Back to top button