---Advertisement---

शेतकरी कुटुंबात वाढलेल्या किशोरच्या अंगावर अभिमानाची वर्दी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : खरंतर असं सर्वसामान्यपणे म्हटले जाते की, आपली परिस्थिती बदलणं आपल्याच हातात असतं. हे योग्यवेळी जाणले तर अडचणीच्या परिस्थितीवर मात करून यशाची पायरी गाठता येते.कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील एका गरीब कुटुंबातील किशोर पांडुरंग माळी हा लेक. किशोर माळी हा शेतकरी कुटुंबातील लेक…

त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडील आणि आई शेतीवरच आपली उपजीविका भागवत तर मोठा भाऊ उद्योग व्यवसाय करून लहान भावाच्या शिक्षणास मदत करत होते. किशोरचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले. तर माध्यमिक शिक्षण हे गावाच्या जवळच्या भागात झाले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

त्याला वर्दीचे आकर्षण असल्याने त्याने फक्त अभ्यास केला नाहीतर मैदानी सराव देखील केला. त्यामुळे, त्याला दोन्ही गोष्टीत यश मिळाले. २०२०च्या एमपीएससीच्या परीक्षेत किशोरने यश संपादन केले आहे. तो पीएसआय झाला.गावातील या होतकरू तरुणाने गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपला मुलगा आता पोलिसांच्या वर्दीत दिसणार या कल्पनेने किशोरच्या आई – वडील भावूक झाले होते.ग्रामीण भागात कमी सुविधा असताना जिद्दीच्या जोरदार किशोरने मोठ्या हिमतीने स्वकर्तृत्वावर जिद्दीने कष्टाने अभ्यास करून यशाला गवसणी घातली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts