⁠  ⁠

शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : कोणतीही परीक्षा असो की नोकरी याच संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे रोशन वामन दुर्गे.

रोशन दुर्गे यांचं बालपण गावातल्याच वस्तीवर गेलं. रोशन हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील गोमणी भागातील मुलचेरा तालुक्यातील लेक.रोशन दुर्गे यांचे वडील शेतमजूर असून घरी आई, दोन मुली, तीन मुलं असा भला मोठा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र आपल्या मुलांना खूप शिकवायचं वामन दुर्गे यांची मोठी इच्छा होती. वडिलांप्रमाणे मुलांना देखील शिक्षणात रस होता. त्यामुळेच सर्वच मुलं शिकले.त्याचे प्राथमिक शिक्षण स्वागवी राजे धर्मराव प्राथमिक शाळेत झालं. त्यांनतर त्यांच्या वडिलांनी गावातील भगवंतराव हायस्कुल येथे ८व्या वर्गात नाव दाखल केले.

त्यानंतर त्यांनी नवोदय विद्यालयची परीक्षा पास केली. नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी वर्धा येथे बी ई (मेकॅनिकल इंजिनियर) केलं. त्यानंतर त्यांनी चिमूर येथे एमएसडब्ल्यू केलं. त्यानंतर त्यांनी २०१६ ते १८ दोन वर्ष नेहरू युवा केंद्र येथे युवा समन्वयक म्हणून काम केलं.इयत्ता नववीनंतर मागे वळून बघितले नाही. घरची हलाखीची परिस्थिती समजून घेऊन वडिलांवर ओझे न बनता त्याने बाहेरच्या बाहेरच काम करत शिक्षण घेतले.

१ मार्च २०१९ ते ३० जून २०२२ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व चंद्रपूर तालुक्यातील दुर्गम भागात ग्राम विकासाबद्दल योगदान दिले. दरम्यान २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षेत कर सहाय्यक व मंत्रालयीन लिपिक ही दोन पदे निघाली होती. करोनामुळे ही परीक्षा मार्च २०२३ ला घेण्यात आली. त्याचा निकाल नोव्हेंबर २०२३ ला जाहीर झाला असून त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. १३ मार्च २०२४ रोजी कर सहाय्यक म्हणून त्यांना नियुक्ती आदेश मिळाला.शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचे कर सहाय्यक पदी वर्णी लागली आहे.

Share This Article
Leave a comment