अखेर अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण.. शीतलची उपजिल्हाधिकारी पदी निवड
MPSC Success Story : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक बाळासाहेब घोलप यांची कन्या शितल हिचे कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. पुढे तिने श्री शिवाजी महाविद्यालयात उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेतले.सीईटी परिक्षेत तिने परभणी जिल्ह्यातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथून कॉम्प्युटर सायन्स या बॅचमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. खाजगी नोकरी न स्वीकारता तिने अभ्यास करण्याचे ठरवले. त्यानुसार तिने अहोरात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. याच जोरावर तिची नोव्हेंबर २०२२ मध्ये एमपीएससीमधून सरळसेवेने राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) या पदावर वस्तू आणि सेवा कर या विभागात निवडली गेली. मार्च २०२३ मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून वन विभागात निवड झाली. त्यानंतरच्या निकालात उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.
सर्वसामान्य कुटुंबातील आणि परभणीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातून शिक्षण पूर्ण केलेल्या शीतल बाळासाहेब घोलप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमामधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. तिचा हा संपूर्ण प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.